‘मोरया’ हे संबोधन मोरगावच्या मयुरेश्वराचं आहे, मोरया गोसावींचं नाही…
‘गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया’ ही वाक्यं एकमुखानं विसर्जनाच्या वेळी निनादत असतात. जेव्हा बाळ गंगाधर टिळकांनी मराठी लोकांमध्ये स्वाभिमान आणि देशभक्ती रुजवण्यासाठी सार्वजनिक गणेशोत्सवांची परंपरा सुरू केली, तेव्हा उत्तर किंवा मध्य भारतात गणेशोत्सवाची परंपरा नव्हती, हे निश्चित, परंतु आता मात्र हिंदी, बिहारी, भोजपुरी किंवा तत्सम चित्रपटांतदेखील नायक मोरयाच्या तालावर नाचताना दिसतो आहे.......